कोल्हापूर : महाड दुर्घटनेत मदतकार्य बजावून आलेल्या व्हाईट आर्मीच्या एका जवानावर चार दारुड्या गुंडांनी हल्ला करून डोक्यात दगड घातला. या घटनेत सदर जवान गंभीर जखमी झाला आहे. प्रेम पीतांबर सातपुते (वय २०, रा. कळंबा) असे जखमी जवानाचे नाव आहे. संभाजीनगर वारे वसाहत येथे मध्यरात्री हा प्रकार घडला असून याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत करण्यात आली आहे.
कोल्हापुरात व्हाइट आर्मीच्या जवानावर गुंडांचा हल्ला, अज्ञातांविरोधात गुन्ह्याची नोंद - white army soldier kolhapur news
महाड दुर्घटनेत मदतकार्याची कामगिरी बजावल्यानंतर कोल्हापुरात परत येऊन कोविड अन्नछत्र सेंटरवर झोपण्यास जात असलेल्या व्हाईट आर्मीच्या जवानावर मद्यपी गुंडांनी हल्ला करून डोक्यात दगड घातला. या घटनेप्रकरणी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जवान प्रेम सातपुते महाड येथील दुर्घटनेतील मदतकार्यात कामगिरी बजावून बुधवारी रात्री परतले. त्यानंतर सातपुते ते वारे वसाहतीच्या पिछाडीस असणाऱ्या कोविड अन्नछत्र सेंटरवर झोपण्यास दुचाकीवरून जात होते. दरम्यान, मध्यरात्री वारे वसाहतीजवळ रस्त्याकडेला मद्यपी गुंड बसले होते. त्यातील चौघांनी त्यांना अडवून हल्ला केला. एकाने त्यांच्या डोक्यात दगड घातला. यात सातपुते गंभीर जखमी झाले. दरम्यान काही नागरिकांनी सातपुते यांची सुटका केली आणि त्यांना सेवा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सातपुते यांनी याबाबतची माहिती सहकाऱ्यांना दिली. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार चौघा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्या आला आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी अन्य काहींना मारहाण केल्याची चर्चा होती. त्यामुळे, तक्रारदारांना पुढे येण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा -कोल्हापूरकरांचा दणका..! एशियन पेंटने 'ती' जाहिरात युट्यूबवरून हटवली