महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद; विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई - कोल्हापुरात लॉकडाऊन

आज (शुक्रवारी) रात्री 8 वाजल्यापासूनच चौका-चौकात पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला आहे. शिवाय अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस
पोलीस

By

Published : Apr 9, 2021, 10:51 PM IST

Updated : Apr 9, 2021, 10:59 PM IST

कोल्हापूर - 'ब्रेक द चेन'अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात आज (शुक्रवारी) रात्री 8 पासून लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. याच पार्श्‍वभूमीवर कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विविध ठिकाणी तपासणी नाकेही उभारण्यात आले आहेत. रात्री 8पासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या विक-एन्ड लॉकडाऊन दरम्यान कोणीही विनाकारण बाहेर फिरणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. शिवाय अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांकडून सुद्धा कोरोनाचे नियम मोडले जाणार नाही, याची काळजीही घेतली जात आहे.

आज (शुक्रवारी) रात्री 8 वाजल्यापासूनच चौका-चौकात पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला आहे. शिवाय अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापुरात या विकेंड लॉकडाऊनला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा.

आढावा घेतांना प्रतिनिधी

हेही वाचा-मिनी टाळेबंदीने सणासुदीत होणाऱ्या वाहन विक्रीवर होणार परिणाम -इक्रा

Last Updated : Apr 9, 2021, 10:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details