महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापुराचा फटका.! पुण्याचे दूध तुटणार; गोकुळने थांबिवले पुण्याच्या दिशेने जाणारे दुधाचे टँकर

पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक पुराच्या पाण्याच्या पाण्यामुळे बंद झाली आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाने पुणे, मुंबईकडे जाणारे दुधाचे टँकर थांबविले आहे.

थांबलेले टँकर

By

Published : Aug 7, 2019, 8:35 PM IST

कोल्हापूर- जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे गोकुळ दूध संघाने दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद असल्याने त्याचबरोबर पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर बंद असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

महापुराचा फटका.!

गोकुळमधून दररोज पुण्याला २ लाख ७० हजार लिटर दूध जाते. तर मुंबईला ७ लाख लिटर दूध जाते. या निर्णयामुळे पुणे आणि मुंबईला दूधाचा तुटवडा जाणवणार आहे. गोकुळचे पुण्याला जाणारे टँकर मंगळवारी रात्रीपासून अडकून पडले आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांबरोबर गोकुळचेही नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details