महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाउमुळे गोकुळची दूधविक्री घटली, दुग्धजन्य पदार्थ उत्पादनावर भर

अगोदर लॉकडाउनचा आणि आता नुकत्याच आलेल्या 'तौक्ते' चक्री वादळाचा, गोकुळ दूध संघाला चांगलाच फटका बसला आहे. सध्या जवळपास ७ ते ८ लाख लिटर दूधाची विक्री घटली आहे.

गोकुळ दूध संघ
गोकुळ दूध संघ

By

Published : May 20, 2021, 4:12 PM IST

कोल्हापूर - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्यात लॉकडाउन सुरू आहे. या लॉकडाउनचा फटका सगळ्याय व्यवसायांना बसत आहे. तसाच, फटका गोकुळच्या दूध व्यवसायालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. दररोज तब्बल एक ते दीड लाख लिटर दुधाची विक्री कमी झाली आहे. कोल्हापूरमध्ये १५ मे पासून लॉकडाउन लावण्यात आलेले आहे. प्रत्यक्षात दूध आणि मेडिकल वगळता कोणताही व्यवसाय सुरू करायला परवानगी नाहीये. असे असतानाही लॉकडाऊनकाळात दूध विक्री कमी होत असताना पाहायला मिळत आहे. परंतु सध्या दूध संकलन सुरळीत सुरू आहे.

दुग्धजन्य पदार्थ उत्पादनावर भर

सध्या गोकुळ दूध संघामध्ये दररोज दोन्ही वेळेला १३ लाख लिटरच्या आसपास दूध संकलन केले जाते. कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकमधूनही दूध संकलन केले जाते. गोकुळ दूध संघामध्ये दुग्धजन्य पदार्थ कमी प्रमाणात बनवले जातात. दुग्धजन्य पदार्थापेक्षा, केवळ दूध विक्रीवर गोकुळचा भर असतो. एकूण संकलन केलेल्या दुधापैकी एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात, तब्बल अडीच लाख लिटर दूध विक्री होते. मात्र, लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून या विक्रीमध्ये घट झाली आहे. मुंबई, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी भागातसुद्धा दूध मोठ्या प्रमाणात जात असते. मात्र, त्या ठिकाणीसुद्धा आता नुकत्याच आलेल्या 'तौक्ते' चक्री वादळाचा फटका बसल्याने दूध विक्री मोठ्या प्रमाणात घटली आहे. या सर्व अडचणीमुळे जवळपास ७ ते ८ लाख लिटर दूध विक्री घटली असून, उरलेल्या दुधाद्वारे वेगळे दुग्धजन्य पदार्थ बनवण्यावर भर दिला जात आहे.

हेही वाचा -भूमिका मांडणार; २७ मे पर्यंत मराठा समाजाने शांत राहावे - संभाजीराजे छत्रपती

ABOUT THE AUTHOR

...view details