कोल्हापूर - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची निवडणूक बुधवारी पार पडली. यामध्ये पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आघाडीने दणदणीत विजय मिळवला. सत्ताधारी गटाला मात्र 4 जागांवरच समाधान मानावे लागले. मोठ्या प्रमाणात झालेल्या क्रॉस वोटिंगमुळे खरंतर सर्वांचीच धाकधूक वाढली होती. हीच धाकधूक मतमोजणीच्या शेवटच्या एका तासात सुद्धा स्पष्टपणे दिसून आली. अंबरीश घाटगे आणि चेतन नरके यांनी तर स्वतः कॅल्क्युलेटर हातात घेत मिळालेल्या मतांची बेरीज करायला सुरुवात केली. शेवटी विरोधी आघाडीचा सर्वसाधारण गटात 3 जागांवर विजय झाला.
सर्वसाधारण गटात शेवटच्या 4 फेरीत मिळालेल्या मतदान -
गोकुळच्या निवडणुकीत सर्वसाधारण गटामध्ये एकूण 16 जागांसाठी सत्ताधारी, विरोधी गटासह एक अपक्ष असे 33 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये सत्ताधारी गटातील तीन उमेदवारांना मिळालेल्या चांगल्या मतांमुळे अधिकच चुरस निर्माण झाली होती.
- 5 वी फेरी :
बाळासाहेब खाडे - 1125 मते घेऊन 12 व्या स्थानी
अंबरीश घाटगे - 1113 मते घेऊन 13 व्या स्थानी
चेतन नरके - 1086 मते घेऊन 14 व्या स्थानी - 6 वी फेरी :
अंबरीश घाटगे - 1318 मते घेऊन 11 व्या स्थानी
चेतन नरके - 1284 मते घेऊन 13 व्या स्थानी
बाळासाहेब खाडे - 1235 मते घेऊन 19 व्या स्थानावर गेले.