महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात १० दिवसांपासून पाऊस नाही; पंचगंगेच्या पाणी पातळीत कमालीची घट - मंदिर

मागील १० ते १२ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस पडला नाही. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. यामुळे नदीपात्रात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पंचगंगेच्या पाणी पातळीत कमालीची घट

By

Published : Jul 22, 2019, 6:36 PM IST

कोल्हापूर- पंचगंगा नदीची पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. मागील १० ते १२ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस पडला नाही. यामुळे नदीपात्रात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पंचगंगेच्या पाणी पातळीत कमालीची घट

मान्सूनचे आगमन होताच कोल्हापूरात जोरात पाऊस पडला. पंचगंगा नदीची पातळीत जवळपास ४० फुटांची वाढ पाहायला मिळाली होती. पण, गेल्या १० दिवसांपासून कोल्हापूरात पाऊस पडला नाही. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. यामुळे नदीपात्रात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीपात्रात पाण्यामुळे बुडालेली मंदिरे आता दिसून येत आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात १४ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोणत्याही भागात झाला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यावेळी पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. शेतकरी वर्गही जोरदार पावसाची वाट पाहत आहे. जिल्हातील राधानगरी, गगनबावडा आणि आजरा या भागांमध्ये सरासरी १४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details