महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

LPG Gas Tanker Overturned : गॅस टँकर झाला पलटी; गॅस गळती सुरू असल्याने कोडोली बोरपाडळे मार्ग बंद

जयगडहुन नागपूरकडे चाललेला एलपीजी गॅस टँकर पलटी ( LPG Gas Tanker Overturned ) झाल्याची घटना घडली आहे. एकूण 35 टनाचा हा टँकर पलटी झाल्याने प्रशासन सुद्धा रात्रीपासून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

LPG Gas Tanker Overturned
गॅस टँकर झाला पलटी

By

Published : Nov 2, 2022, 10:39 AM IST

कोल्हापूर : जयगडहुन नागपूरकडे चाललेला एलपीजी गॅस टँकर पलटी ( LPG Gas Tanker Overturned ) झाल्याची घटना घडली आहे. ड्रायव्हरचा गाडीवर ताबा सुटल्याने हा टँकर पलटी झाला. त्यामुळे रात्री दहा ते अकरा वाजल्यापासून टँकर मधून गॅसची गळती मोठ्या प्रमाणात सुरू ( Leakage of gas from tanker on large scale ) असल्याची माहिती समोर आली आहे.

बोरपाडळे कोडोली मार्गावरून वाहतूक बंद : सुरक्षेच्या कारणास्तव बोरपाडळे कोडोली हा मार्ग आता पूर्णपणे सील करण्यात आला असून या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. शिवाय पन्हाळा आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या दोन अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे बोरपाडळे परिसरात कोणीही प्रवास करणे टाळून अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. याठिकाणी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


रात्रीपासून गॅस गळती सुरू : रात्रीपासून गॅस गळती सुरू असल्याने प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. शिवाय परिसरात सद्यस्थितीत मोबाईल सुद्धा वापर न करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. एकूण 35 टनाचा हा टँकर पलटी झाल्याने प्रशासन सुद्धा रात्रीपासून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details