कोल्हापूर- जिल्ह्यातील आजरा येथील रवळनाथ गॅस एजन्सीची गाडी पुलाला धडकून पलटी झाली. गाडी पलटी झाल्याने यातील सिलेंडरच्या टाक्या पुलावरून खाली पाण्यामध्ये पडून त्या वाहून गेल्याची घटना घडली. वाहून जाणारे सिलेंडर पाहण्यासाठी अनेकांनी याठिकाणी गर्दी केली होती.
गॅस एजन्सीच्या गाडीचा आजरा येथे अपघात; गाडीतील सिलेंडर गेले नदीत वाहून - व्हिक्टोरिया पुल
आजऱ्या जवळील व्हिक्टोरिया पुलावर गॅस सिलेंडरची गाडी पलटी झाली. ही संपूर्ण गाडी 96 मोकळ्या सिलेंडरने भरली होती तर, यामधील 10 सिलेंडर भरलेले होते. गाडी पलटी झाल्याने ते सर्व सिलेंडर पुलावर खाली हिरण्यकेशी नदीतून वाहून गेले.
![गॅस एजन्सीच्या गाडीचा आजरा येथे अपघात; गाडीतील सिलेंडर गेले नदीत वाहून](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3988627-669-3988627-1564482047070.jpg)
अपघात
गॅस एजन्सीच्या गाडीचा आजरा येथे अपघात; गाडीतील सिलेंडर गेले नदीत वाहून
आजऱ्या जवळील व्हिक्टोरिया पुलावर गॅस सिलेंडरची गाडी पलटी झाली. ही संपूर्ण गाडी 96 मोकळ्या सिलेंडरने भरली होती तर, यामधील 10 सिलेंडर भरलेले होते. गाडी पलटी झाल्याने ते सर्व सिलेंडर पुलावर खाली हिरण्यकेशी नदीतून वाहून गेले. सर्वच सिलेंडर मोकळे असल्याने यावेळी मोठी दुर्घटना टळली. नदीतून वाहून जाणारे सिलेंडर पाहण्यासाठी लोकांनी पुलावर गर्दी केली होती. पाण्यातून वाहून जाणारे सिलेंडर कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.