कोल्हापूर - कष्टकरी शेतकरी व कामगारांचे नेते ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. येथील कसबा बावडा स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी 1 पर्यंत प्रा. एन. डी. पाटील यांचे पार्थिव सदर बाजार येथील शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. कोरोना नियमाचे पालन करुनच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
ND Patil passed away: एन. डी. पाटील यांच्यावर दुपारी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार, उपमुख्यमंत्री होणार दाखल - कसबा बावडा स्मशानभूमी
ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. येथील कसबा बावडा स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठवणींना उजाळा दिला
प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांपासून विविध मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. शरद पवार सुद्धा निधनाची बातमी समजताच सर्व कार्यक्रम रद्द करून कोल्हापूरला रवाना झाले होते. संपूर्ण पवार कुटुंबीय आज प्रा. एन. डी. पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोल्हापुरात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुद्धा सकाळी साडे 9 वाजता कोल्हापुरात आगमन होणार आहे. त्याचबरोबर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध मंत्री आणि मान्यवर प्रा. पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोल्हापुरात येणार आहेत.