महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात 14 कोरोनाबाधितांची वाढ; 6 जण कोरोनामुक्त

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 894 वर पोहोचली आहे. 732 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. 150 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

kolhapur corona update
कोल्हापूर कोरोना अपडेट

By

Published : Jul 4, 2020, 7:03 AM IST

कोल्हापूर-कोल्हापुरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. गुरुवार रात्री 8 वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत आणखी 14 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 6 जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 894 वर पोहोचली आहे. 732 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शुक्रवारपर्यंत(3 जुलै) एकूण 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 150 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोल्हापूरची कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी वाढत चालली असून ही चिंतेची बाब बनली आहे.

इचलकरंजीमध्ये सुद्धा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून खबरदारी घेण्याची गरज आहे.

शुक्रवारपर्यंत तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :

आजरा- 84

भुदरगड- 76

चंदगड- 95

गडहिंग्लज- 105

गगनबावडा- 7

हातकणंगले- 16

कागल- 58

करवीर- 27

पन्हाळा- 29

राधानगरी- 69

शाहूवाडी- 187

शिरोळ- 10

नगरपरिषद क्षेत्र- 61

कोल्हापूर महापालिका क्षेत्र-50

एकूण 874

तसेच इतर जिल्हा व राज्यातील 20 असे मिळून एकूण 894 रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

जिल्ह्यातील एकूण 894 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 732 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 12 जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या 150 इतकी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details