महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kolhapur Corona Update : कोल्हापूरात कोरोनाचे ४ हजार सक्रिय रुग्ण, फक्त 'इतके' रुग्णच घेताहेत रुग्णालयात उपचार - कोल्हापुरातील सक्रिय कोरोना रुग्ण संख्या

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत ( Covid Spread In Kolhapur ) असली तरी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र कमी आहे. सद्यस्थितीत कोल्हापुरात ४ हजार सक्रिय रुग्ण ( Active Covid Patients In Kolhapur ) असून, त्यातील अवघे ३१९ रुग्णच रुग्णालयातून उपचार घेत आहेत.

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Jan 27, 2022, 8:20 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर वाढतच चालला ( Covid Spread In Kolhapur ) आहे. मागील सलग ७ ते ८ दिवस कोल्हापूर जिल्ह्यात ५०० हुन अधिक रुग्ण दररोज आढळत आहेत. आज सुद्धा दिवसभरात कोल्हापूरात ६२४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर एका जणाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ६०६ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ७६९ वर पोहोचली ( Active Covid Patients In Kolhapur ) आहे. यातील केवळ ३१९ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर उरलेले रुग्ण घरातूनच उपचार घेत आहेत.

  • जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर

कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या २ लाख १६ हजार ३७८ वर पोहोचली आहे. त्यातील २ लाख ५ हजार ७७५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ७६९ वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या ५ हजार ८३४ झाली आहे.

  • मृतांच्या आकडेवारीवर एक नजर

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकूण २ लाख १६ हजार ३७८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील ५ हजार ८३४ जणांचा मृत्यू आला आहे. यामध्ये विशेष म्हणजे ६१२ जण कोल्हापूर जिल्ह्याबाहेरचे आहेत.

  • कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र - 1271 जणांचा मृत्यू
  • नगरपालिका भागातील 837 जणांचा मृत्य
  • जिल्हयाबाहेरील - 612 मृत
  • वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे
    1 वर्षाखालील - 358 रुग्ण
    1 ते 10 वर्ष - 7838 रुग्ण
    11 ते 20 वर्ष - 18195 रुग्ण
    21 ते 50 वर्ष - 124460 रुग्ण
    51 ते 70 वर्ष - 51898 रुग्ण
    71 वर्षांवरील - 13629 रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details