कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे क्रूझर आणि डंपरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात २ जणांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले असून, 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर छत्रपती प्रमिळराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोल्हापुरात क्रूझर-डंपरचा भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू, १२ जखमी - radhanagari
राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे क्रूझर आणि डंपरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात २ जणांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले असून, 3 जणांची प्रकृती गंभीर आहे.
कोल्हापुरात क्रूझर आणि डंपरचा भीषण अपघात
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझर राधानगरीहून कोल्हापूरकडे येत होती. यामध्ये जवळपास १६ प्रवासी होते. प्राथमिक माहितीनुसार सर्वजण कोल्हापूरमधील एमआयडीसीमध्ये एका कारखान्यात काम करत होते. यावेळी घोटवडे येथील स्वयंभू मंदिरानजीक महामार्गावर डंपर आणि क्रूझरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात क्रूझरचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. अपघातानंतर या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.