कोल्हापूर - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज सुद्धा सकाळपासून रात्री 9 पर्यंत 19 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 402 वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्णांची संख्या शाहूवाडी तालुक्यातील आहे. शिवाय कोल्हापुरात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापुरात कोरोनाचा चौथा बळी; कोरोनाबाधितांची संख्या 402 वर - कोल्हापूर कोरोना बातमी
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 402 वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्णांची संख्या शाहूवाडी तालुक्यातील आहे.
रुग्णालय
कोल्हापुरातकोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 वर पोहोचली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील एका 52 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सुद्धा कोल्हापूरात एकाचा मृत्यू झाला होता. आज सलग दुसऱ्या दिवशी आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सद्या 359 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.