कोल्हापूर - एकाच कुटुंबातील चार जण कृष्णा नदीत बुडाल्याची हृदयद्रावक घटना बेळगाव मध्ये घडली आहे. कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातल्या अथणी तालुक्यात ही घटना घडली असून पाण्यात बुडालेल्या बांधवांचा अजूनही शोध सुरू आहे. अंथरून धुण्यासाठी गेल्यानंतर ही धक्कादायक घटना घडली. एनडीआरएफ, कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून ही शोधमोहीम सुरू आहे. स्कुबा डायव्हिंगद्वारे पथकातील जवानांकडून सकाळपासून शोध मोहीम सुरू आहे.
कर्नाटकमधील एकाच कुटुंबातील चार भाऊ बुडाले; अजूनही शोधकार्य सुरू - kolhapur news
सर्वजण नदीमध्ये बुडाले असून मंगळवार सकाळपासून त्यांची शोधमोहीम सुरू आहे. परशुराम गोपाल बनसोडे (वय 36), सदाशिव गोपाल बनसोडे (वय 24), शंकरा गोपाल बनसोडे (वय 20), दर्याप्पा गोपाल बनसोडे (वय 22) अशी पाण्यात बुडालेल्या चार भावांची नावे आहेत.
शोधमोहीम सुरूच