महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात कोरोनाचे 411 नवे रुग्ण; 245 जणांना डिस्चार्ज

कोल्हापूरात 411 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4375 वर पोहोचली आहे. 1634 जण कोरोनामुक्त झाले असून 2620 जणांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 121 वर पोहोचली आहे.

Kolhapur corona update
कोल्हापूर कोरोना अपडेट

By

Published : Jul 27, 2020, 1:40 PM IST

कोल्हापूर- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. गेल्या काही दिवसात 200 हून अधिक रुग्ण वाढत होते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही चिंतेची बाब आहे. मात्र, रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत जिल्ह्यात तब्बल 411 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनामुक्त झाल्यामुळे 245 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 9 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

411 रुग्णांची वाढ झाल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4375 इतकी झाली आहे.1634 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत 121 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2620 अ‌ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण कोल्हापूर आणि त्यापाठोपाठ इचलकरंजी शहरात आढळले आहेत. दोन्ही शहरांमध्ये रुग्णांची एकूण संख्या जवळपास दोन हजार पर्यंत पोहोचली आहे.

रविवार पर्यंत तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :
आजरा- 107
भुदरगड- 99
चंदगड- 344
गडहिंग्लज- 207
गगनबावडा- 9
हातकणंगले- 321
कागल- 79
करवीर- 512
पन्हाळा- 196
राधानगरी- 152
शाहूवाडी- 248
शिरोळ- 132
नगरपरिषद क्षेत्र- 950
कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 959
असे एकूण 4315

इतर जिल्हा व राज्यातील 60 असे मिळून एकूण 4375 रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 4375 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 1634 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 121 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे सद्यस्थितीत अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2620 इतकी आहे.

वयोगटानुसार एकूण रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :
1 वर्षांपेक्षा लहान - 15 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 238 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 443 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 2595 रुग्ण
51 ते 70 वर्ष - 915 रुग्ण
71 वर्षांपेक्षा जास्त - 168 रुग्ण

एकूण 121 मृत रुग्ण पुढीलप्रमाणे

इचलकरंजी - 41 कोल्हापूर शहर - 18 हातकणंगले - 12 गडहिंग्लज - 6 करवीर - 12
आजरा - 2 शिरोळ - 4 जयसिंगपूर - 2 शाहूवाडी - 1 पन्हाळा - 3
चंदगड - 4 भुदरगड -1 हुपरी - 5 कुरुंदवाड -1 कागल-1

इतर जिल्हा आणि राज्यातील 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details