महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर : रंगपंचमी खेळून पोहायला गेलेल्या चौघा मुलांचा मृत्यू - कोल्हापूर रंगपंचमीला चौघांचा बुडून मृत्यू

जिल्ह्यात विविध ठिकाणी रंगपंचमी खेळून पोहायला गेलेल्या चौघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन शाळकरी मुलांचा समावेश आहे.

कोल्हापूर

By

Published : Apr 2, 2021, 8:22 PM IST

कोल्हापूर- रंगपंचमी खेळून पोहायला गेलेल्या चौघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये पन्हाळा तालुक्यातील दोघे तर करवीर आणि शिरोळ तालुक्यातील प्रत्येकी एक अशा चौघांचा समावेश आहे. पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमधील शुभम पाथरवट आणि शिवराज साळोखे यांचा विहिरीत, करवीर तालुक्यातील शिंगणापूर गावातील यशराज माळी या मुलाचा पाण्याच्या खणीमध्ये तर शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडच्या अकिब यासीन बागवान या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यात दोघा मुलांना बुडताना वाचविण्यात काहींना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पन्हाळा तालुक्यात रंगपंचमीच्या निमित्ताने रंग खेळून विहिरीवर पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना तालुक्यातील कोडोलीमध्ये आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. विहीर खोल असल्याने मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले होते अखेर कोडोलीमधील सामाजिक कार्यकर्त्यांना अथक परिश्रमानंतर तीन वाजता मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. यामध्ये 9 वीच्या वर्गात शिकणाऱ्या शिवराज कृष्णा साळोखे आणि 8 वीमध्ये शिकणाऱ्या शुभम लक्ष्मण पाथरवट या दोघांनी आपला जीव गमवावा लागला आहे. याच पद्धतीने करवीर तालुक्यातील शिंगणापूर गावातील यशराज माळी या मुलाचा पाण्याच्या खणीमध्ये बुडून मृत्यू झाला तर शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडमधील अकिब यासीन बागवान (वय 24) याचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रंगपंचमी दिवशी चौघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details