कोल्हापूर :संतोष शिंदे यांच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये माजी नगरसेविका आणि पोलिस अधिकाऱ्याचा उल्लेख होता. या दोघांना बेड्या घालण्यात पोलिसाना यश आले आहे. कोल्हापूर पोलिसांच्या टीमने दोघांना कर्नाटकातील विजापूरमधून ताब्यात घेतले आहे. तर अन्य दोघांचा ताब्यात घेण्यासाठी पोलीस पुणे परिसरात पथक गस्त घालत आहे.
पोलिसांचे पथक आरोपांची मागावर : रविवारी दिवसभर पोलिसांची दोन पथके या आरोपींच्या मार्गावर होती. दरम्यान पोलिसांनी माजी नगरसेविकेसह पोलीस अधिकारी राहुल राऊतला अटक केली आहे. कर्नाटकातील विजापूर येथून या दोघांना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अन्य दोघांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक पुणे परिसरत फिरत आहे.
चिठ्ठीत मिळाले नगरसेविकेचे नाव : गडिंग्लज येथील उद्योजक संतोष शिंदे यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली जात होती. खंडणीच्या आणि ब्लॅमेलच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली होती. दरम्यान संतोष शिंदे यांनी कुटुंबासह आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ज्यात ज्या महिलेने शिंदे यांच्याविरोधात खोट्या बलात्काराची तक्रार दिली तिचे व तिच्या साथीदाराचे नाव लिहिले होते. या दोघांमुळे आत्महत्या केल्याचे संतोष शिंदे म्हणाले होते. चिठ्ठी नाव असलेली महिला ही माजी नगरसेविका आहे. तसेच महिलेचा साथीदार पोलीस अधिकारी असून त्याचे नाव राहुल राऊत आहे. दरम्यान संतोष शिंदे यांनी आत्महत्या केल्याचे सजताच या माजी नगरसेविका आणि तिचा साथीदार यांनी गडिंग्लज येथून पलायन केले होते. पोलिसांनी याप्रकरणी माजी नगरसेविका आणि पोलीस अधिकारी राहुल राऊत, विशाल बाणेकर, संकेत पाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेणे सुरू केले.