महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजून महादेवराव महाडिक सही सलामत; खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं - गोकुळ निवडणूक महादेवराव महाडिक टीका

अनेक मंडळी गोकुळच्या कारभारावर टीका करतात, त्याची दखल घेण्याची गरज नाही. खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असाल तर लक्षात ठेवा महादेवराव महाडिक सही सलामत आहे, असे प्रति आव्हान माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विरोधकांना दिले. गोकुळ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Apr 24, 2021, 7:24 PM IST

कोल्हापूर- अनेक मंडळी गोकुळच्या कारभारावर टीका करतात, त्याची दखल घेण्याची गरज नाही. खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असाल तर लक्षात ठेवा महादेवराव महाडिक सही सलामत आहे, असे प्रति आव्हान माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विरोधकांना दिले. गोकुळ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. चक्रव्युहाच्या बाहेर जायचे का नाही, हे महाडिक ठरवणार. त्यामुळे विरोधकांनी कोणत्याही अविर्भावात राहू नये, येणारा काळ ठरवेल आणि तो काळ कोणाच्या हातात नसतो.

गोकुळ निवडणूक धुमशान
विनाकारण विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये, असे आवाहन माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केले.गोकुळच्या कर्मचाऱ्यांना विचारा गोकुळचा कारभार कसा आहे? संघ आर्थिक सक्षम आहे, आजही बाहेरून मदत घेत नसलेला हा दूध संघ एकमेव आहे. कोल्हापुरात अनेक संघ आहेत आणि झाले. पण, गोकुळ दूध संघाला कोणी शह देऊ शकले नाही, असेही महादेवराव महाडिक म्हणाले.
महाडिकांना पैशाची मस्ती - सतेज पाटील
सर्वसामान्य दूध उत्पादकांना लुटून महादेवराव महाडिक यांना पैशाच्या जोरावर मस्ती आलीय. ही मस्ती आणि मग्रुरी उतरवायची असेल तर करवीर तालुक्याने आपली ताकद लावली पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले होते. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणूक प्रचारावेळी ते बोलत होते. गेल्या २५ वर्षात टँकरच्या माध्यमातून संघाला लुटण्याचे काम एका व्यक्तीने केले आहे. आम्ही चांगला संघ चालवला, असे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची पाठ थोपटून घेतात तर गोपाळ संघ का बंद केला, असा सवाल पाटील यांनी केला.

हेही वाचा -हा तर पालकमंत्र्यांच्या हट्टाचा बळी; धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details