कोल्हापूर - कोल्हापूरजवळील शिरोली गावाजवळ पुणे-बंगळुरु या राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आले आहे. तसेच पावसाचा जोर कायम राहिल्यास महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून याठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आले पुराचे पाणी; एकेरी वाहतूक सुरू - राष्ट्रीय महामार्ग
कोल्हापूरजवळील शिरोली गावाजवळ पुणे-बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आले आहे. तसेच पावसाचा जोर कायम राहिल्यास महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून याठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
![पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आले पुराचे पाणी; एकेरी वाहतूक सुरू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4050758-thumbnail-3x2-kol.jpg)
अखेर राष्ट्रीय महामार्गावर आले पुराचे पाणी
अखेर राष्ट्रीय महामार्गावर आले पुराचे पाणी
कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४८.८ फुटांवर पोहोचली आहे. तर शिरोली गावाजवळील पुणे-बंगळुरु या राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आले. त्यामुळे येथे सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. जर पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी आणखी वाढण्याची आणि महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. महामार्ग बंद झाल्यास येथे वाहतूक ठप्प होऊ शकतो. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Last Updated : Aug 5, 2019, 8:56 PM IST