कोल्हापूर - जिल्ह्यात आलेल्या पुराचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी, नागरिक, व्यापारी, उद्योजक व शेतमजूर यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी, या प्रमुख मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी टायर इनरने वाचवले सरकारने बुडवले अशा घोषणा देण्यात आल्या.
टायर इन्नरने वाचवले सरकारने बुडवले; नुकसान भरपाईसाठी पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा - काँग्रेसचे आमदार सतेज पाटील
जिल्ह्यात आलेल्या पुराचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी, नागरिक, व्यापारी, उद्योजक व शेतमजूर यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी, या प्रमुख मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
नुकसान भरपाईसाठी पुरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने पूरग्रस्त सहभागी झाले होते. या मोर्चात महिलांचासुद्धा लक्षणीय सहभाग होता.