कोल्हापूर- महापुरामुळे येथील चिखली आणि आंबेवाडी गावातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र, तिथल्या जनावरांसाठी या नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. आमचे स्थलांतर झाले मात्र त्या जनावरांचे काय? असा सवाल काही नागरिकांनी केला आहे. आमचा जीव आता इथे तळमळतोय म्हणत अनेक नागरिकांना अश्रू अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
VIDEO : आमचे स्थलांतर केले.. पण जनावरांचे काय? चिखली,आंबेवाडीतील नागरिकांना अश्रू अनावर - कोल्हापूर पूर बातमी
महापुरामुळे येथील चिखली आणि आंबेवाडी गावातील नागरिकांचे स्थलांतर केले आहे. पण, तिथल्या जनावरांचे काय? असा सवाल काही नागरिकांनी केला आहे. आमचा जीव आता इथे तळमळतोय म्हणत अनेक नागरिकांचे अश्रू अनावर झाले आहेत.
जनावरांसाठी चिखली आंबेवाडीतील नागरिकांचे अश्रू अनावर
अनेकांना आता आपल्या जनावरांची काळजी लागली आहे. 4 दिवसांपासून एकटी जनावरे त्याठिकाणी अडकून पडली आहेत. काही जनावरे तर आता 10 महिन्यांची गाभण आहेत. अशा परिस्थिती त्या जनावरांना त्या ठिकाणीच सोडून नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले. नागरिकांची जनावरांसाठी सुरू असलेली तळमळ मन हेलावणारी आहे.. त्यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.