कोल्हापूर - गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. भात, भुईमूग, सोयाबीन या पिकांची काढणीला आलेली रोपं वाया गेली आहेत. हजारो रुपये खर्च करून आणलेलं पीक डोळ्यादेखत खराब होत असलेल पाहून शेतकरी हवालदिल झालाय. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे भाताची शेती भूईसपाट झाली आहे. तर भुईमूगाच्या शेंगांना कोंब आल्याची परिस्थिती आहे.
हजारो हेक्टरवरील पीकं कुजली, शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत - chandrakant patil in kolhapur
अतिवृष्टीमुळे काढणीला आलेलं पीक जमीनदोस्त झालंय. यामध्ये ऊस, सोयाबीन, भात, मूग, उडीद, मका, बाजरी, ज्वारी, भुईमूग, केळी आणि घेवडा या पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पीकं कुजली असून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱयांनी केली आहे.
नव्याने लागण केलेला ऊस देखील वाया गेलाय. शेतात पाणी साचून राहिल्याने ऊस कुजण्याच्या मार्गावर आहे. कोल्हापूरातील करवीर तालुक्यात देखील अशीच परिस्थिती आहे.
अतिवृष्टीमुळे काढणीला आलेलं पीक जमीनदोस्त झालंय. यामध्ये ऊस, सोयाबीन, भात, मूग, उडीद, मका, बाजरी, ज्वारी, भुईमूग, केळी आणि घेवडा या पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पीकं कुजली असून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱयांनी केली आहे.
'तत्काळ मदत जाहीर करा' - चंद्रकांत पाटील
सर्वच ठिकाणी परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यातील भात, भुईमूग, सोयाबीन, मका, ऊस पीक साचलेल्या पाण्यात कुजत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यापूर्वीच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली होती. मात्र राज्य सरकारने कशाचीही वाट न पाहता तात्काळ मदतीची घोषणा करावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.