कोल्हापूर - घरात पाणी आल्यावर आम्ही घर सोडून बाहेर गेलो. आता पूर ओसरल्यावर घरात येऊन बघितले, तर होत्याचे नव्हते झालेले दिसले. मी आणि माझे पती दोघेच राहतो. मात्र, नवऱ्याला अर्धांगवायू झाला आहे. आता मी एकटी संसार कसा उभारणार? असा प्रश्न विचारत माऊली चक्क रडायला लागली. शहरातील बुधवार पेठेतील पुराचा फटका बसलेल्या कुटुंबाची ही करुण कहाणी आहे.
माऊलीची करुण कहाणी : नवऱ्याला अर्धांगवायू, पाण्यात बुडालेला संसार आता एकटी कसा उभारू? - पाण्यात बुडालेला संसार
गेल्या ८ ते १० दिवसांपासून कोल्हापुरात पुराचा हाहाकार माजला होता. पुराचे पाणी रविवारपासून ओसरायला सुरुवात झाली. सोमवारी पाणी ओसरल्यानंतर आपल्या घराची नेमकी काय स्थिती झाली? हे बघण्यासाठी नागरिकांनी घराकडे धाव घेतली. मात्र, घराची स्थिती बघून त्यांना अश्रू अनावर झाले.
गेल्या ८ ते १० दिवसांपासून कोल्हापुरात पुराचा हाहाकार माजला होता. पुराचे पाणी रविवारपासून ओसरायला सुरुवात झाली. सोमवारी पाणी ओसरल्यानंतर आपल्या घराची नेमकी काय स्थिती झाली? हे बघण्यासाठी नागरिकांनी घराकडे धाव घेतली. मात्र, घराची स्थिती बघून त्यांना अश्रू अनावर झाले. काही लोकांनी घराची स्वच्छता करून संसार थाटण्याचा विचार केला. मात्र, घरात जीवनावश्यक वस्तू नाही. पुरामुळे संपूर्ण घरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रोगराई होण्याची शक्यता आहे.
शहरातील अनेक घरांमध्ये चिखलाचे साम्राज्य आहे. अनेकांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा महापूर होता. असा महापूर आम्ही कधी पाहिला नाही, अशा प्रतिक्रिया अनेक महिला देत आहेत.