महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुराचा तालमींनाही फटका; कोल्हापुरात पैलवानांवर डाळ-भात खाण्याची वेळ - आहार - विहारावर काटेकोरपणे लक्ष

महापुरामुळे मागील आठ दिवसांपासून तालमीमध्ये विजेची सोय नाही, प्यायला पाणी नाही, जो नियमित आहार असतो तो देखील पैलवानांना मिळालेला नाही. आहार-विहारावर काटेकोरपणे लक्ष ठेवणाऱ्या पैलवानांनी मागील आठ दिवसांत डाळ भात खाऊन दिवस काढले आहेत.

महापुराचा फटका कोल्हापुरातील पैलवानांना

By

Published : Aug 13, 2019, 8:32 PM IST

Updated : Aug 13, 2019, 8:47 PM IST

कोल्हापूर - महापुराचा फटका येथील तालमीतील अनेक पैलवानांना देखील बसला आहे. येथील बहुतांश पैलवान बाहेर गावावरुन आले आहेत. त्यामुळे महापुराच्या काळात या पैलवानांचे चांगलेच हाल झाले आहेत.

महापुराचा फटका कोल्हापुरातील पैलवानांना

महापुरामुळे मागील आठ दिवसांपासून तालमीमध्ये विजेची सोय नाही, प्यायला पाणी नाही, जो नियमित आहार असतो तो देखील पैलवानांना मिळालेला नाही. काही सामाजिक संस्थांनी याठिकाणी अन्न - पाण्याची सुविधा पुरवली होती. मात्र, त्यावरच पैलवानांचे फक्त 2 दिवस निघाले.

आहार - विहारावर काटेकोरपणे लक्ष ठेवणाऱ्या पैलवानांनी मागील आठ दिवसांत डाळ भात खाऊन दिवस काढले आहेत. दरम्यान, काही पैलवानांनी आम्हाला खायला नसले, तरी चालेल. पण कोल्हापूरकरांचे जवजीवन लवकरात लवकर सुरळीत झाले पाहिजे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Last Updated : Aug 13, 2019, 8:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details