कोल्हापूर- जिल्ह्यात आज सकाळी आणखी 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या 7 दिवसांपासून कोल्हापुरात दररोज नवीन कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे, आता जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 55 वर पोहोचली आहे. आज नवीन सापडलेल्या 5 रुग्णांमध्ये 2 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे.
कोल्हापुरात आढळले कोरोनाचे पाच नवे रुग्ण, बाधितांची संख्या 55 वर
जिल्ह्यात आज सकाळी आणखी 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सीपीआरमधील एक महिला, राधानगरीमधील 39 वर्षीय महिला आणि 58 वर्षीय पुरुष तर आजरामधील 24 वर्षांच्या तरुणासह एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 55 वर पोहोचली आहे.
सीपीआरमधील एका महिला, राधानगरीमधील 39 वर्षीय महिला आणि 58 वर्षीय पुरुष तर आजरामधील 24 वर्षांच्या तरुणासह एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तर, रविवारी 17 मे रोजी दिवसभरात तब्बल 14 नवीन रुग्ण सापडले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होत आहे. विशेषतः हे सर्व रुग्ण मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील इतर रेड झोनमधून प्रवास करून कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
अजूनही जवळपास 3 हजार जणांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले नाहीत. यातील बहुतांश नागरिक मुंबई आणि पुण्यातूनच प्रवास करून कोल्हापूरात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची आकडेवारी 55 वर पोहोचली आहे. त्यातील 12 जणांना सीपीआरमधून तर एकाला आयजीएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या 41 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.