कोल्हापूर - 360 एक्सप्लोरर मार्फत एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यासोबत सह्याद्रीच्या मावळ्यांनी अफलातून विश्वविक्रम केला आहे. भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांनी 73 फुट तिरंगा युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रुसच्या बेसकॅम्पवर फडकवला आहे. या मोहिमेत 10 वर्षाचा साई कवडे, तुषार पवार, भूषण वेताळ, सागर नलावडे, आनंद बनसोडे यांचा समावेश आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 73 फुटी तिरंगा फडकला युरोपच्या सर्वोच्च शिखराच्या बेसकॅम्पवर - indian climber hoisted 73 feet tall tiranga
360 एक्सप्लोरर मार्फत एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यासोबत सह्याद्रीच्या मावळ्यांनी अफलातून विश्वविक्रम केला आहे. भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांनी 73 फुट तिरंगा युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रुसच्या बेसकॅम्पवर फडकवला आहे.
आनंद बनसोडे यांनी जुलै 2014 मध्ये माउंट एल्ब्रुस हे शिखर सर केले होते. आता ते या टीमचे मार्गदर्शक म्हणून पुन्हा या मोहिमेवर आहेत. 360 एक्सप्लोररची ही विश्वविक्रमी टीम छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडावरील माती, छत्रपतींची प्रतिमा एल्ब्रुस पर्वत शिखरावर घेऊन जाणार आहे. पुण्यातील साई कवडे हा सर्वात लहान आशियाई या शिखरावर प्रथम पाऊल ठेवणार आहे. त्यामुळे गिर्यारोहण क्षेत्रातील संपूर्ण देशाचे लक्ष या मोहिमेकडे लागले आहे.
360 एक्सप्लोरर मार्फत 15 ऑगस्ट रोजी युरोपातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवण्याची मोहीम आयोजित केली गेली होती. यात 10 वर्षाचा साई कवडे हा एल्ब्रुस शिखर सर करणारा आशियातील सर्वात लहान मुलगा ठरणार आहे. 15 ऑगस्ट रोजी अंतिम चढाईला निघण्यापूर्वी आनंद बनसोडे, साई कवडे, कोल्हापूरचा सागर नलावडे, औरंगाबादचा भूषण वेताळ, साताऱ्याचा तुषार पवार यांनी 73 फुटी तिरंगा 13 हजार फुटांवर असलेल्या एल्ब्रुस बेसकॅम्पवर फडकावून विदेशात सर्वात लांब तिरंगा फडकवण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. याची नोंद वेगवेगळ्या रेकॉर्डमध्ये होणार आहे असे आनंद बनसोडे यांनी सांगितले. एल्ब्रुस मोहिमेनंतर 360 एक्सप्लोररची टीम भारतात येऊन लगेच कोल्हापूर सांगली येथे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जाणार आहे. कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्त लोकांना या संकटातून सावरण्याची प्रेरणा देण्यासाठी युरोपातील सर्वोच्च शिखराच्या बेसकॅम्पवर खास कोल्हापुरी फेटा बांधून या टीमने तिरंग्याला अभिवादन केले.