कोल्हापूर - जगात भारी अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात नेहमीच काहीतरी खास पाहायला मिळत आणि याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली असून काही मुली पॉकेटमनीतील पैशातून सीपीआर रुग्णालयातील रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना रोज सकाळी घरी बनवलेला सकस नाश्ता देण्याचे काम करत आहेत. मिळालेल्या पॉकेटमनीमधून पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम खाण्याची त्यांची सवय होती. पण, एक दिवस कोविड लसीकरणाच्या चौकशीसाठी त्या सीपीआर रुग्णालयात आल्या.
लसीकरणाच्या चौकशीसाठी सीपीआरमध्ये आल्यावर रुग्णांच्या नातेवाईकांचे होत असलेले हाल पाहून त्यांनी घेतला निर्णय
कोल्हापुरातील दुधाळी-हरीमंदिर परिसरात एकाच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्रुती चौगुले, अर्पिता राऊत, श्रेया चौगुले, आचल कट्यारे आणि नेहा पाटील या पाच मैत्रिणी लसीकरणाच्या चौकशीसाठी सीपीआर रुग्णालयात आल्या होत्या. तेव्हा त्यांना सीपीआर रुग्णालयात तेथील रुग्णांच्या नातेवाईकांची होत असलेली धावपळ पाहायला मिळाली. या धावपळीच्या दरम्यान अनेकांच्या पोटाचे हाल होत असतील हाच विचार तिच्या डोक्यात आला. त्यानंतर त्यांनी रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज नाश्ता, फळे, पाणी द्यायचे ठरवले. दोन दिवस या मुली सीपीआर रुग्णालयात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्या वॉर्डच्या बाहेर आपल्या दुचाकी गाडीवरून नाश्ता घेऊन येत आहेत आणि नातेवाईकांना देत आहेत. त्यांनी आपल्या या छोट्या ग्रुपला 'ड्रीम टीम' असे नाव दिले आहे.
सुरुवातीला घरच्यांनीही केला विरोध