महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरातील राधानगरी अभयारण्य परिसरात आग, ५० एकर वनक्षेत्रातील वनस्पती खाक - fire news in kolhapur

कोल्हापुरातील राधानगरी अभयारण्यात सुमारे ५० एकर परिसरात भीषण आग लागली. या आगीत वृक्षसंपदा तसेच वन्यजीवांचे मोठे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

Fire in Radhanagari The sanctuary in Kolhapur
कोल्हापूरातील राधानगरी अभयारण्य परिसरात ५० एकर वनक्षेत्रात आग

By

Published : Mar 13, 2020, 7:12 AM IST

कोल्हापूर - राधानगरी अभयारण्य परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वृक्षसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक वन्यजीवांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास ५० एकर वनक्षेत्रात ही आग लागली. वाऱ्यामुळे ही आग वाढत गेल्याने ही आग पसरली.

काही स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. राधानगरी अभयारण्य परिसरात अशा प्रकारे आग लागल्याच्या घटना शक्यतो घडल्या नाहीयेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत. वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

कोल्हापूरातील राधानगरी अभयारण्य परिसरात ५० एकर वनक्षेत्रात आग

ABOUT THE AUTHOR

...view details