कोल्हापूर- येथील शिरगाव येथील दूध संघासमोर चाललेल्या गोकुळच्या दूध टँकर आग लागली. यात टँकरचे दोन्ही टायर जळून खाक झाले असून चालक बेशुद्ध असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
गोकुळच्या टँकरला आग; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली - shahabaz shaikh
शिरगाव येथील दूध संघासमोर चाललेल्या गोकुळच्या दूध टँकर आग लागली. यात टँकरचे दोन्ही टायर जळून खाक झाले असून चालक बेशुद्ध असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
आग विझविताना अग्निशमन दलाचे जवान
टँकरच्या शिडीला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शॉर्टसर्किट झाला. यामुळे टँकरच्या केबिनमध्ये आग लागली. ही आग वाढत जाऊन टँकरचे दोन्ही टायर जळून खाक झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने ही आग विझविण्यात यश आले आहे. सुदैवाने कोणतिही जीवित हानी झाली नाही.