कोल्हापूर -बैलगाडी शर्यतीला परवानगी नसतानाही कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात केळोशी बुद्रुक येथे चिखलगुट्टा बैलगाडी शर्यती पार पडल्या. कोरोनातही हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती. या स्पर्धेच्या 15 आयोजकांवर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा -पालघर : नागझरी येथे तीन वाहनांचा अपघात; पाच जखमी
- परवानगी नसतानाही भरवली बैलगाडी शर्यत -
राज्यात बैलगाडी शर्यतीला बंदी आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा आयोजन करण्यास बंदी आहे. मात्र ही बंदी झुगारून कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुक येथील शर्यत प्रेमींनी रविवार 26 सप्टेंबर रोजी माळरानावर परवानगी न घेता चिखल गुट्टा बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास दहा पेक्षा अधिक स्पर्धक या शर्यतीला सहभागी झाले होते. तर पंचक्रोशीतील हजारो शर्यत प्रेमी ही शर्यत पाहण्यास घटनास्थळी दाखल होते.
- 15 जणांवर गुन्हा दाखल