कोल्हापूर- जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती आता आणखी गंभीर होत चालली आहे. रविवारी दिवसभरात तब्बल 53 नवे रुग्ण आढळले आहेत तर 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोल्हापूरमधील कोरोना रुग्णांची संख्या 1236 वर पोहोचली आहे. त्यातील 850 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर 25 जणांचा मृत्यू झालाय. सद्यस्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 361 झाली आहे.
रविवारी वाढलेल्या 53 रुग्णांमध्ये सर्वाधिक 16 रुग्ण कोल्हापूर शहरातील आहेत. त्यापाठोपाठ चंदगड तालुक्यातील 9, नगरपालिका क्षेत्रातील 17, करवीर तालुक्यातील 5, शिरोळ तालुक्यातील 3, गडहिंग्लज तालुक्यातील 2 आणि इतर राज्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
कोल्हापूर शहरात रुग्णांची संख्या वाढत चाललीय त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने सुद्धा आता कडक भूमिका घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
रविवरपर्यंत तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :
आजरा- 95
भुदरगड- 80
चंदगड- 153
गडहिंग्लज- 127
गगनबावडा- 7