महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिंताजनक....कोल्हापूरमध्ये 15 कोरोनाबाधित रुग्ण वाढले; 725 जण कोरोनामुक्त

कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या कोल्हापूरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 865 वर पोहोचली आहे. 725 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.

kolhapur corona update
कोल्हापूर कोरोना अपडेट

By

Published : Jul 2, 2020, 2:08 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 15 रुग्ण वाढले आहेत तर 5 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 865 वर पोहोचली आहे तर त्यातील 725 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एकूण 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 128 अ‌ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी ही चिंतेची बाब बनली आहे.

मागील आठवड्यांमध्ये कोल्हापुरातील अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 34 वर गेली होती. मात्र, तेंव्हापासून पुन्हा 90 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 128 वर गेली आहे.

बुधवारपर्यंत तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :

आजरा- 81 भुदरगड- 76 चंदगड- 91
गडहिंग्लज- 105 गगनबावडा- 7 हातकणंगले- 16
कागल- 58 करवीर- 25 पन्हाळा- 29
राधानगरी- 69 शाहूवाडी- 186 शिरोळ- 9
नगरपरिषद क्षेत्र- 48 कोल्हापूर महापालिका क्षेत्र-47

इतर जिल्हा व राज्यातील 17 असे मिळून बुधवारअखेर पर्यंत जिल्ह्यात 865 एवढी रुग्ण संख्या आहे. जिल्ह्यातील 725 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 12 जणांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 128 इतकी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details