कोल्हापूर - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि सात-बारा कोरा करावा, या मागणीसाठी कोल्हापूरमधील ६० हजार शेतकऱ्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे. काहींनी तर स्वत:च्या रक्ताने आपली व्यथा मांडली आहे.
सरसकट कर्जमाफीसाठी ६० हजार शेतकऱ्यांचे राज्यपालांना पत्र - कर्जमाफी
भाजपाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात बारा कोरा व्हावा, या मागणीसाठी थेट राज्यपालांना पत्र लिहिण्याचे आवाहन केले होते. त्याला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा -कर्जमाफीचा पहिला मान 'या' गावाला; शेतकऱ्यांनी मानले सरकारचे आभार
ही पत्र आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राज्यपालांकडे सुपूर्द केली जाणार आहेत. भाजपाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा व्हावा, या मागणीसाठी थेट राज्यपालांना पत्र लिहिण्याचे आवाहन केले होते. त्याला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ही पत्रे घेऊन समरजीतसिंह मुंबईकडे रवाना झाले आहेत.