कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आणखीनच आक्रमक झाली आहे. गेल्या 9 दिवसांपासून कोल्हापुरातील महावितरण कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून शुक्रवारी 4 मार्चला राज्यभर चक्काजाम आंदोलनाची घोषणा ( Farmers Will Protest In Maharashtra ) करण्यात आली आहे. स्वतः राजू शेट्टी ( Raju Shetty ) यांनी याबाबत माहिती दिली.
'या' मागन्यांसाठी सुरू आहे धरणे आंदोलन -शेतीला दिवसा 10 तास विनाकपात वीज द्या, शेतीपंपाच्या वीज बिलांची तत्काळ दुरूस्ती करावी, शेतीपंपाची कनेक्शन तोडणे त्वरीत थांबवावे, अन्यायी वीज बील वसुली थांबवावी आदी मागण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापुरातील महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे. 22 फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने शेट्टी आता आक्रमक झाले आहेत.
उर्जामंत्र्यांचा शेट्टींशी दूरध्वनीद्वारे चर्चा -दरम्यान, ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Minister Nitin Raut ) यांनी मंगळवारी (दि. 2 मार्च) सकाळी राजू शेट्टी यांनी फोनद्वारे संवाद साधल्याची माहिती स्वतः शेट्टी यांनी दिली. यावेळी त्यांनी आपण चर्चेला का येत नाही, अशी राऊत यांनी विचारणा केली. मात्र, आपण आजपर्यंत केलेल्या अनेक आंदोलनात कोणतीही चर्चेची दारे बंद केली नाही. त्यामुळे तुम्ही चर्चेला बोलवले नाही त्यामुळे आम्ही आलो नसल्याचे शेट्टींनी राऊत यांना सांगितले. मात्र, चर्चेला बोलावले तर आपण नक्की येऊ, असेही शेट्टी यांनी म्हंटले. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मात्र सुरूच राहणार असल्याचे शेट्टी यांनी म्हटले.
दोन दिवसांपासूनच कार्यकर्ते आक्रमक -दरम्यान, कोल्हापुरातील महावितरण कार्यालयाबाहेर गेल्या एक आठवड्यापासून धरणे आंदोलन सुरू आहे. स्वतः राजू शेट्टी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. शेट्टी यांच्या या आंदोलनामुळे कार्यकर्तेही दोन दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. कागल तसेच सांगली येथील महावितरण कार्यालयही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेटवले तर अनेक शासकीय कार्यालयांमध्ये साप सोडले जात आहेत. त्यात आज शेट्टी यांनी 4 मार्चला राज्यभर चक्काजाम आंदोलनाची घोषणा ( Farmers Will Protest In Maharashtra ) केली आहे.
हेही वाचा -Raju Shetty Vs Government : आकडेवारीसह स्पष्टीकरण द्या महाराष्ट्राला कळेल चोर कोण आहे - राजु शेट्टी