कोल्हापूर -साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असली, तरी तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने गेल्या गळीत हंगामातील एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाही. या निषेधार्थ जय शिवराय किसान संघटनेच्यावतीने पन्हाळा तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
थकीत एफआरपीची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन - तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना
साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असली, तरी तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने गेल्या गळीत हंगामातील एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाही. या निषेधार्थ जय शिवराय किसान संघटनेच्यावतीने पन्हाळा तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
साखर आयुक्तांनी आरआरसी अंतर्गत सदर कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी सांगितले होते. ही कारवाई संबधीत विभागातील तहसीलदारांनी करायची असते. मात्र पन्हाळा तहसीलदारांनी यासंदर्भात कारवाई केली नाही. त्यामुळे जय शिवराय किसान संघटनेच्यावतीने तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांची देणी देण्यात यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आरआरसी अंतर्गत कारवाई केले नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत शेतकऱ्यांची देणी देण्यात येणार नाहीत. तोपर्यंत हे आंदोलन असेच चालूच ठेवण्याचा इशारा जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिला आहे.