महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेघोली तलावफुटीच्या दुर्घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, पंचनामे करून तत्काळ भरपाईची मागणी - megholi dam breach

मेघोली तलाव फुटून पाण्याच्या प्रवाहाने पुढच्या अनेक गावातील शेतकऱ्यांची जमीन अक्षरशः वाहून गेली असून त्याठिकाणी मोठं मोठे दगड वाहून आले आहेत. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांचे ओढ्यालगत असलेली वाहने तसेच काहींच्या घरात सुद्धा पाणी शिरल्याचे समोर आले आहे. काहींचे तर पॉवर ट्रिलर सुद्धा वाहून गेले आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसानझ पंचनामे करून तात्काळ भरपाईची मागणी

तलावफुटीच्या दुर्घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान,
तलावफुटीच्या दुर्घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान,

By

Published : Sep 2, 2021, 10:56 AM IST

Updated : Sep 2, 2021, 11:28 AM IST


कोल्हापूर- भुदरगड तालुक्यातील मेघोली येथील लघु तलाव फुटल्याची घटना घडली आहे. बुधवारी (1 सप्टेंबर) रात्री उशिरा ही घटना घडली. हा प्रकल्प फुटल्याने अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाऊन नवले गावातील एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर काहीजणांना बचावण्यात यश आले आहे. दरम्यान, या फुटलेल्या तलावातील पाण्यामुळे तलाव परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाय काही रस्ते सुद्धा वाहून गेले असून आजूबाजूच्या काही गावाचा संपर्क तुटला आहे. शिवाय नुकसान भरपाई सुद्धा द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

तलावफुटीच्या दुर्घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान,

महिलेचा मृत्यू, जनावरे दगावली-

या दुर्घटनेत नवले गावातील जिजाबाई मोहिते (वय 55) यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य थोड्यक्यात बचावले आहेत. शिवाय शेजारीच असलेल्या निवृत्ती मोहिते यांच्याही घरात पाणी शिरल्याने त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये त्यांची चार जनावरे गोठ्यातच मृत्युमुखी पडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ओढ्यालगत असणाऱ्या काहींच्या घराशेजारी लावलेल्या मोटारसायकल सुद्धा वाहून गेल्या असून शेतीची मात्र मोठे नुकसान झाले आहे.

तलावफुटीच्या दुर्घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान,

शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी -

मेघोली तलाव फुटून पाण्याच्या प्रवाहाने पुढच्या अनेक गावातील शेतकऱ्यांची जमीन अक्षरशः वाहून गेली असून त्याठिकाणी मोठं मोठे दगड वाहून आले आहेत. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांचे ओढ्यालगत असलेली वाहने तसेच काहींच्या घरात सुद्धा पाणी शिरल्याचे समोर आले आहे. काहींचे तर पॉवर ट्रिलर सुद्धा वाहून गेले आहेत. अचानक तलाव फुटल्याने पाण्याच्या मोठा लोंड्यामुळे मेघोली, सोनूर्ली, नवले, वेंगुरूळ, ममदापूर आदी गावातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने आता तात्काळ पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

रात्रीच्या सुमारास तलाव फुटल्यानंतर नागरिकांनी गावच्या ओढ्याकडे धाव घेत पाहणी केली. तसेच नवले गावकऱ्यांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. रात्रीच्या सुमारास पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लागत नव्हता, मात्र सकाळ होताच शेतकऱ्यांचे या पाण्यामुळे होत्याचे नव्हते झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पिकामध्ये पाणी साचल्याने मोठ्या कष्टाने पिकवलेल पीक पाण्यात गेले आहे.

Last Updated : Sep 2, 2021, 11:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details