कोल्हापूर : शिये गावाच्या पुनर्वसनासाठी आंदोलकांनी घेतली नदीत उडी - आंदोलकांनी घेतली नदीत उडी
कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या शिये गावाला देखील दरवर्षी येणाऱ्या महापुराचा फटका बसतो. त्यामुळे गावाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आज या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने पंचगंगा नदीच्या घाटावर आत्मदहन आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर - महापुराचा फटका यंदा जिल्ह्यातील सर्वच गावांना बसला आहे. करवीर तालुक्यातील शिये हे गाव देखील पाण्याखाली बुडाले होते. या गावाचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी आज (सोमवारी) शेतकरी संघटनेने पंचगंगा नदी घाटावर आंदोलन केले. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट पंचगंगा नदीच्या पात्रात उडी घेतली. यावेळी पोलीस आणि महानगरपालिकेचे अग्निशामन दलाच्या वतीने या आंदोलनकर्त्यांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान झालेल्या प्रकारामुळे पोलिसांची देखील तारांबळ उडाली.