कोल्हापूर -थकीत एफआरपीवरील व्याज रक्कमेच्या वसुलीसाठी आरआरसी अंतर्गत नोटीस काढावी या मागणीसाठी तहसील दालनात धरणे धरून बसलेल्या शेतकरी आंदोलकांनी मंगळवारी (दि. 22 जून) आक्रमक पवित्रा घेतल्याचे पहायला मिळाले. शेतकरी लेकीचा सत्कार म्हणून साडी, बांगड्या, टॉवेल, टोपी, हळद, कुंकू, नारळ, असा आहेर शेतकरी महिलांनी तहसीलदारांना दिला. मात्र, तहसीलदार आपर्णा मोरे यांनी शासनाच्या कोविड नियमालीमुळे आहेर स्वीकारण्यास नकार दिला.
आंदोलन अंकुशच्या धरणे आंदोलनाला शेतकऱ्यांचे पाठबळ
शिरोळ तहसीलदार दलन येथे आंदोलन अंकुशने सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला तालुक्यातील शेतकऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी (दि. 22 जून) तहसील दालनात शेकडो शेतकऱ्यांनी ठाण मांडली होती. एवढेच नाही तर आंदोलक शेतकऱ्यांनी तहसिल आवारातच गॅस शेगडी आणून शेतकऱ्यांसाठी जेवनावळ घातली. तहसील कार्यालयात शेतकऱ्यांच्या द्रोण, पत्रावळी घेवून जेवनासाठी बसलेल्या रांगा पाहून नागरीक आवक् झाल्याचे पाहायला मिळाले.