कोल्हापूर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. गेल्याच महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. जवळपास 15 दिवसांनी त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर त्यांची तब्येत सुद्धा ठणठणीत होती. मात्र, सकाळी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राजू शेट्टी पुन्हा रुग्णालयात दाखल; सद्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती - शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची तब्येत
अद्याप त्यांच्या उपचाराबाबत माहिती मिळाली नसली तरी प्राथमिक माहितीनुसार त्यांचे वजन वाढल्याने त्रास जाणवत होता. म्हणूनच तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते.
![राजू शेट्टी पुन्हा रुग्णालयात दाखल; सद्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती नेते राजू शेट्टी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9345190-730-9345190-1603890869755.jpg)
विमान प्रवासात अचानक अस्वस्थ वाटू लागले
अद्याप त्यांच्या उपचाराबाबत माहिती मिळाली नसली तरी प्राथमिक माहितीनुसार त्यांचे वजन वाढल्याने त्रास जाणवत होता. म्हणूनच तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते. शेट्टी दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये होते. आज विमानातून परत येत असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यात उतरताच तेथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव सौरभ शेट्टी यांनी दिली असून त्यांची तब्बेत ठीक असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, सर्वच त्यांच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत.