महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Unnecessary slander of family : शहिद जवानाच्या कुटुंबाला त्रास देणारे ग्रामसेवक निलंबीत - Martyr Jawan Rishikesh Jondhale

शहिद जवानाच्या कुटुंबीयांना ग्रामसेवक त्रास देत असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामसेवकाने ऋषिकेश जोंधळे ( Martyr Jawan Rishikesh Jondhale ) कुटुंबीयांच्या विरोधात पोस्टर लावले आहे. यातून जोंधळे कुटुंबीयांची नाहक बदनामी (Unnecessary slander of family ) हाेत असल्याचा आरोप जोंधळे कुटुंबीयांनी केला आहे.

Rishikesh Jondhale
ऋषिकेश जोंधळे

By

Published : Jun 12, 2022, 11:36 AM IST

Updated : Jun 12, 2022, 12:31 PM IST

कोल्हापूर - शहिद जवानाच्या कुटुंबीयांना ग्रामसेवक त्रास देत असल्याची माहिती समोर आली आहे. त्या ग्रामसेवकाने गावामध्ये ऋषिकेश जोंधळे ( Martyr Jawan Rishikesh Jondhale ) कुटुंबीयांच्या विरोधात पोस्टर लावले आहे. यातून जोंधळे कुटुंबीयांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप जोंधळे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील वीस वर्षीय तरुण ऋषिकेश जोंधळे यांना 13 नोव्हेंबर 2020 रोजी वीर मरण प्राप्त झाले होते. पाकिस्तानी लष्कराशी झुंज देताना त्यांचा मृत्यू ( Martyred while fighting the Pakistani army ) झाला होता.

ग्रामसेवकाचे निलंबन - मात्र, शहीद जवानाच्या कुटुंबीयांना ग्रामसेवक त्रास देत असल्याची माहिती समोर आली आहे. त्या ग्रामसेवकाने गावामध्ये जोंधळे यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात पोस्टर लावले आहे. यातून कुटुंबीयांची नाहक बदनामी होत असल्याचा आरोप जोंधळे कुटुंबीयांनी केला आहे. यामुळे ग्रामसेवकाचा विरोधात जोंधळे कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. जोंधळे कुटुंबीयांच्या जिवाला धोका असून पोलीस संरक्षणाची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद मुख्य कार्य अधिकारी संजय सिंग चव्हाण यांनी ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई केली आहे.

ऋषिकेश जोंधळे यांचे नातेवाईक

कुटुंबियांची पोलीस संरक्षण देण्याची मागणी -कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथे राहणाऱ्या 20 वर्षीय जवान ऋषिकेश जोंधळे यांना पाकिस्तानी लष्कराशी लढतांना विर मरण आले होते. यानंतर शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र, बहिरेवाडी येथील ग्रामसेवक राजेंद्र उर्फ दत्तात्रय शंकरनाथ डवरी याच्याकडून जोधळे यांच्या कुटुंबीयांना त्रास देत असल्याचे म्हटले आहे. तशी तक्रार त्यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे ( Police Superintendent Shailesh Balakwade ) यांना केली आहे. या पत्रात त्यांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच या पत्राची प्रत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाही पाठवली आहे.

गावात लावलेले अपमानास्पद पोस्टर

देशासाठी कोणी मरायला सांगितले -ग्रामसेवक राजेंद्र उर्फ दत्तात्रय शंकरनाथ डवरी राहणार मुम्मेवाडी ता. आजरा यांच्याकडून जोंधळे यांच्या कुटुंबीयांना त्रास देत आहे. तसेच जोंधळे यांचे वडील रामचंद्र जोंधळे यांना कोणी तुझ्या मुलाला देशासाठी मरायला सांगितले होते, असे अपशब्द वापरले. ज्या तिरंग्यामध्ये मुलाचा मृतदेह आणला गेला तो तिरंगा जबरदस्तीने काढून टाकण्यात आल्याचा आरोप जोंधळे कुटुंबीयांनी केला आहे.ग्रामसेवकाने जोंधळे कुटुंबियां विरोधात बदनामीकारक पोस्टर लावले आहे. या पोस्टरवर ग्रामसेवक राजेंद्र डवरी प्रेमी मित्र मंडळ असे लिहिलेले आहे. सोबतच दिनांक 1 जून 2022 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास रामचंद्र हरिबा जोंधळे, पुंडलि सदाशिव जोंधळे , लक्ष्मण हरिबा जोंधळे आणि दिपक सदाशिव जोंधळे या चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याचे म्हटले आहे. तर बाजूला ग्रामसेवक राजेंद्र डवरी याचा जखमी अवस्थेतील फोटो आहे. या पोस्टरमुळे जोंधळे कुटुंबियांची बदनामी होत असल्याने त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

हेही वाचा-Jammu Kashmir Encounter : पुलवामात तीन दहशतवादी ठार, सुरक्षादलाची मोठी कारवाई

Last Updated : Jun 12, 2022, 12:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details