कोल्हापूर- जिल्ह्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. नदीकाठच्या अनेक गावांमध्ये आता पुराचे पाणी शिरले आहे. पुराचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्याने रात्रीपासून पुणे-बंगळुरू महामार्ग बंद करण्यात आला आहे. या पुराचे आकाशातून केलेले exclusive चित्रीकरण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. या महापुराची दृश्य सर्वात प्रथम ईटीव्ही भारतवर.
Exclusive video : कोल्हापुरात पुणे-बंगळुरु महामार्गावर पाणीच पाणी, पाहा कोल्हापूरातील महापूर - Kolhapur Flood News
पुराचे पाणी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पोहोचले असून हा महामार्ग बंद करण्यात आला आहे.
कोल्हापूरात पावसाने अक्षरशः कहर केला आहे. त्यामुळे सर्वच नद्या, नाले आणि ओढ्यांना महापूर आला आहे. पुराचे पाणी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पोहोचले असून हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. या महापूराचे कोल्हापूरातील शिवम बोधे यांनी चित्रीकरण केले आहे. पाहा महाप्रलयाची exclusive दृश्य फक्त ईटीव्ही भारतवर.
राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथील राजाराम बंधाऱ्यांची पाणी पातळी 48 फूट 2 इंचावर गेली आहे. शिवाय, जिल्ह्यातील १०७ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर शहराप्रमाणेच, जिल्ह्यातील अनेक गावांत हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून, तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.