महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 6, 2019, 4:13 AM IST

ETV Bharat / state

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे शिवसेनेत प्रवेश करणार?

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी हॉटेल सयाजी येथे आवाडे भेटणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. दोघांच्या भेटीनंतर प्रकाश आवाडे नेमके कुठल्या पक्षात जातील हे ठरेल.

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे शिवसेनेत प्रवेश करणार?

कोल्हापूर - माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा व पक्षाला सोडचिट्टी दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी इचलकरंजी येथे आवाडे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे आता आवाडे शिवसेनेत प्रवेश करणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा -'इचलकरंजी दहा वर्षे मागे गेली, ही चर्चा दुरुस्त करायची असेल तर प्रकाश आवाडेच पाहिजेत'

प्रकाश आवाडे यांनी बुधवारी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीमाना देत इचलकरंजीतून अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली होती. भाजपने काश्मीर मधील कलम 370 बाबत काँग्रेस नेतृत्वाने केलेला विरोध चूकीचा असल्यानेच आपण हा निर्णय घेतल्याचे आवाडे यांनी सांगितले होते. त्यानंतर शुक्रवारी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक व आवाडे दोघांमध्ये जवळपास 1 तास बंद खोलीत झाली चर्चा झाली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी हॉटेल सयाजी येथे आवाडे भेटणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. दोघांच्या भेटीनंतर प्रकाश आवाडे नेमके कुठल्या पक्षात जातील हे ठरेल.

हेही वाचा - तांबडा-पांढरा रश्श्यासाठी प्रसिद्ध कोल्हापुरात पाच दिवस मटन-चिकन बंद; सकल मराठा समाजाकडून आंदोलनाचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details