कोल्हापूर- सकाळी सात वाजल्यापासून ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची घटना कोल्हापुरात पाहायला मिळाली. गेल्या तासाभरापासून यंत्रणेत बिघाड असल्याने अद्यापही मतदान सुरू झाले नाही. कोल्हापुरातील जवाहरनगर हायस्कूलमधील एका मतदान केंद्रावरील घटना घडली असून मतदारांच्या रांगा लागल्या आहेत.
कोल्हापूर : जवाहरनगर हायस्कूल मतदान केंद्रावरील 'ईव्हीएम'मध्ये बिघाड - evm problem in kolhapur
गेल्या 1 तासापासून मतदार मतदान केंद्राबाहेर ताटकळत उभे आहेत. काही शिवसैनिकांनी तत्काळ मशीन सुरू करण्याची मागणी केली.
कोल्हापुरातील ईव्हीएममध्ये बिघाड
हेही वाचा -माहिममध्ये लोकांना बदल हवा - संदिप देशपांडे
गेल्या 1 तासापासून मतदार मतदान केंद्राबाहेर ताटकळत उभे आहेत. काही शिवसैनिकांनी तत्काळ मशीन सुरू करण्याची मागणी केलीय. सध्या दुसरे मशीन आणण्यात आले असून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.