कोल्हापूर -गोकुळ दूधसंघाची पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा दूध संघ म्हणून ओळख आहे. या दूध संघाची आता निवडणूक पार पडणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. निवडणुकीसाठी एकूण ४८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील ३४१ जणांचे अर्ज वैध ठरले होते. आता त्यापैकी आज किती उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
गोकुळ दूधसंघाची निवडणूक; उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस - कोल्हापूर गोकूळ दुध संघ
गोकुळ दुधसंघाची पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा दूध संघ म्हणून ओळख आहे. या दूध संघाची आता निवडणूक पार पडणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. निवडणुकीसाठी एकूण ४८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील ३४१ जणांचे अर्ज वैध ठरले होते. आता त्यापैकी आज किती उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
केवळ ३६ जणांनी आजपर्यंत उमेदवारी अर्ज घेतले माघारी
६ एप्रिल ते २० एप्रिल हा कालावधी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा होता. मात्र, या कालावधीत केवळ ३६ उमेदवारांनीच आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या शेवटच्या दिवशी कोण उमेदवार अर्ज मागे घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे. दरम्यान, थोड्याच वेळात गोकुळ सत्ताधारी आणि विरोधक आपापले उमेदवार जाहीर करणार असल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे लागून राहिल्या आहेत.
हेही वाचा -लॉकडाऊनचा निर्णय होणार? साडेतीन वाजता मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक