कोल्हापूर - फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकणे कोल्हापुरातील एका उमेदवाराला चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवाराला वादग्रस्त पोस्ट प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. डॉ. प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे असे या उमेदवाराचे नाव आहे. ते हातकणंगले विधानसभा मतदार संघातुन अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या कोल्हापुरातील उमेदवाराला नोटीस - election-commisiion-notice-to-candited
फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करणे कोल्हापुरातील एका उमेदवाराला चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवाराला वादग्रस्त पोस्ट प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

डॉ. प्रशांत गंगावणे यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर एक पोस्ट टाकली. या पोस्टमुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे कारण देत हातकणंगलेच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता दामले-कुलकर्णी यांनी त्यांना नोटीस बजावली आहे. गंगावणे यांना याबाबत 24 तासाच्या आत खुलासा सादर करण्याच्या सूचना या नोटिसद्वारे देण्यात आली आहे. खुलासा मुदतीत न सादर केल्यास किंव्हा समाधानकारक न वाटल्यास भारतीय दंड विधान संहिता 1860 चे कलम 188 व 171 (जी) प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी दामले-कुलकर्णी यांनी दिला आहे.