हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीची धाड कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल इथल्या निवासस्थानी आज पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड असून हसन मुश्रीफ यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज पहाटेच्या सुमारास ईडीचे चार ते पाच अधिकारी कागल येथील हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापा टाकत कागदपत्राची तपासणी सुरू केली. यामुळे एकच खळबळ उडाली असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पहाटे पडली धाड :माजी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मागे इडीचा ससेमिरा लागला आहे. आज पहाटेच्या सुमारास ईडीचे 4 ते 5 अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी येत तपासणी सुरू केली आहे. दीड महिन्यात मुश्रीफ यांच्या घरावरील ही दुसरी धाड आहे. हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत देखील यापूर्वी ईडीने छापा टाकत काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली होती. अवघ्या काही दिवसातच पुन्हा कागल येथील घरावर पुन्हा एकदा ईडीची धाड पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळीच मुश्रीफ यांच्या घरी येऊन छाननी सुरू केली असून या कारवाईत कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून मुश्रीफ यांच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
यामुळे इडीची पिडा मुश्रीफ यांच्या मागे :संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर धाड पडली आहे. कोलकाता मधील बोगस कंपन्यांमधून 158 कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते. हा पैसा आला कुठून? ही कंपनी आहे कुठे? मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे हा, असा दावा किरीट सोमय्या यांनी केली होता. तसेच या प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील सोमय्या यांनी केली होती. अवघ्या पंधरा दिवसात हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतदेखील पथकाने तब्बल दोन दिवस कागदपत्रांची तपासणी केली. दरम्यान या चौकशीतून समोर काय आले हे अद्याप कळू शकले नसले तरी दोन दिवसांपूर्वीच जिल्हा बँकेचे लेखा परीक्षण करण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत.
हसन मुश्रीफ यांना मिळाला होता दिलासा : हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर होत असलेल्या या कारवाई विरोधात न्यायालयात धाव घेतली. दरम्यान याबाबतचे काल सुनावणी पार पडली असून यामध्ये हसनमुश्रीफ यांना दिलासा मिळाला आहे. तर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांना जोरदार झटका बसला आहे. हसन मुश्रीफ यांचा त्या प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना किरीट सोमय्यांना कोर्टाच्या आदेशांची तसेच प्रकरणाच्या एफआयआरची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते? असा सवाल न्यायालयाने विचारला आहे.
हेही वाचा :Hasan Mushrif On Kirit Somaiya :... तर आमदारकीचा राजीनामा देणार - हसन मुश्रीफ