महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : कोल्हापुरात गाईच्या शेणापासून बनविल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती - गाईच्या शेणापासून गणेश मूर्ती

शेणापासून बनविलेल्या या मूर्तींचे वजन इतर मूर्तींच्या तुलनेत हलके आहे. 300 ते 400 ग्रॅम वजनामध्ये राहुल कुंभार यांनी आकर्षक घरगुती मूर्ती बनविल्या असून पुढच्या वर्षीपासून सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्ती बनविण्याचा त्यांचा मानस आहे.

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Aug 21, 2020, 9:40 AM IST

कोल्हापूर - प्लास्टर ऑफ पॅरिसला फाटा देत माती तसेच कागदी लगद्यापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविलेल्या आपण यापूर्वी पाहिल्या आहेत. पण या वर्षी कोल्हापुरात देशी गाईच्या शेणापासून गणेशमूर्ती बनविण्यात आल्या आहेत. कोल्हापुरातील एका कुंभाराने या मूर्ती बनविल्या असून नागरिकांनी सुद्धा या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती खरेदी करायला प्राधान्य दिले आहे.

गाईच्या शेणापासून बनविल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

टोप गावातील राहुल कुंभार गेल्या अनेक वर्षांपासून गणेशमूर्ती बनवतात. यापूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ते बनवत होते. मात्र, त्यापासून बनवलेल्या मूर्ती पर्यावरणाला हानिकारक असल्याने ते याला पर्याय शोधत होते. अनेकजण शाडूच्या मूर्ती बनवतात. मात्र, शाडूची माती सुद्धा हल्ली सहजासहजी मिळत नाही. शिवाय शाडूच्या मूर्तींचे वजन जास्त असते. यावर पर्याय म्हणून त्यांनी गाईच्या शेणापासून मूर्ती बनवायचे ठरवले. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी मेहनत घेतली आणि यावर्षी शेणापासून मूर्ती बनविल्या आहेत. वजनाला हलकी आणि दिसायलाही देखणी असलेल्या या गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे.

हेही वाचा -मुश्रीफांची केविलवाणी धडपड केवळ निष्ठा दाखवण्यासाठी; चंद्रकांत पाटील यांचा टोला

या मूर्ती साकारण्यासाठी त्यांनी शेणामध्ये अनेक घटकांचा वापर करून मूर्ती मजबूत बनवली आहे. यामध्ये त्यांनी राख, तूप, दही, ताक, मध, साखर, डिंक तसेच नैसर्गिक रंग या सर्व गोष्टींचा वापर केला आहे. मूर्तीला शेणाचा वास येऊ नये म्हणून त्यांनी हळद आणि कडुलिंबाच्या पाल्याच्या वापर केला आहे. शेणापासून बनविलेल्या या मूर्तींचे वजन इतर मूर्तींच्या तुलनेत हलके आहे. 300 ते 400 ग्रॅम वजनामध्ये राहुल कुंभार यांनी आकर्षक घरगुती मूर्ती बनविल्या असून पुढच्या वर्षीपासून सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्ती बनविण्याचा त्यांचा मानस आहे.

हेही वाचा -अखेर लालपरीने वेस ओलांडली, कोल्हापूर-सांगली मार्गावर एसटी धावली

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. मात्र, शेणापासून बनविलेल्या या मूर्तींमुळे प्रदूषणाला आळा बसणार आहे. त्यामुळे अनेकजण स्वतःहून अशा मूर्ती खरेदी करण्याला पसंती देत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details