महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Counting Of Votes Kolhapur District Bank : मतपेट्यांमधून नेत्यांना चिठ्ठ्या लिहून मतदारांकडून कानपिचक्या - जिल्हा बँक निवडणुक

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली (KDCC Bank Election 2022) असून काही वेळात निकाल हाती येण्याची शक्यता आहे. (Counting of votes of Kolhapur District Bank) दरम्या, मतमोजणी करताना मतपेटीतून नेत्यांना लिहिलेल्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत. 'सर्व उमेदवार राजकारणी असून निवडणूक झाल्यानंतर एकत्र येणार' असल्याचा टोला नेत्यांना या चिठ्ठ्यांमध्ये लगावला आहे.

जिल्हा बँक निवडणुकीच्या मतपेटीतून निघाल्या नेत्यांना लिहिलेल्या चिठ्ठ्या
जिल्हा बँक निवडणुकीच्या मतपेटीतून निघाल्या नेत्यांना लिहिलेल्या चिठ्ठ्या

By

Published : Jan 7, 2022, 10:32 AM IST

Updated : Jan 7, 2022, 10:46 AM IST

कोल्हापूर -जिल्हा बँक निवडणुकीच्या मतपेटीतून नेत्यांना लिहिलेल्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदारांचा हा प्रयोग आहे. (KDCC Bank Election 2022) मतपत्रिकेतून या चिठ्ठ्या टाकल्याचे समोर आले आहे. सर्व उमेदवार राजकारणी असून निवडणूक झाल्यानंतर एकत्र येणार असल्याचा टोला नेत्यांना या चिठ्ठ्यांमध्ये लगावला आहे. यामध्ये नेत्यांजवळ असणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दलही टिप्पणी करण्यात आली आहे. तसेच, एका मतपेटीतून तर पन्नास रुपये निघाले आहेत.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून काही वेळात निकाल हाती येण्याची शक्यता आहे. येथे एकूण 21 जागांपैकी 6 जागांवर सत्ताधारी गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. (KDCC Bank Election 2022) उरलेल्या 15 जागांसाठी ही निवडणूक लागली होती. (KDCC Bank Voting) त्यामुळे आता पंधरा जागांवर कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापूर येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे ही मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

सत्तारूढ गटाचे नेतृत्व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांकडे

जिल्हा मध्यवर्ती बँकेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांची सत्ता होती. पुढे हीच युती कायम राहील अशी शक्यता होती. मात्र, जागावाटपाची चर्चा फिस्कटतयानंतर शिवसेना सत्ताधाऱ्यांपासून वेगळी झाली आणि त्यांनी स्वतंत्र पॅनेल निर्माण केले. शिवसेना बाजूला होताच सत्ताधाऱ्यांनी भाजपशी जुळवून घेत निवडणुकीत उमेदवार जाहीर केले. सत्तारूढ गटाचे नेतृत्व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे करत आहेत. तर, शिवसेनेचे नेतृत्व खासदार संजय मंडलिक करत आहेत. दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे करण्यात आल्याने आता कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

निकालाकडे सर्वांचे लक्ष

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ( KDCC Bank Election 2022 ) 98 टक्के इतके मतदान ( KDCC Bank Voting ) झाले आहे. आज (दि. 7 जानेवारी 2022) शुक्रवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे ही मतमोजणी होणार असून, त्याची सर्व तयारी झाली आहे. एकूण 15 जागांसाठी निवडणूक लागली होती. यामध्ये नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विशेष म्हणजे प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागतील अशी शक्यता आहे.

हेही वाचा -कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुखाची लहर, 10 हजार प्रतिक्विंटल मिळाला भाव

Last Updated : Jan 7, 2022, 10:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details