महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुर्दैवी! ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या मराठी शास्त्रज्ञाचा चेन्नईत ऑक्सिजन अभावीच मृत्यू - कोल्हापूर न्यूज अपडेट

कोल्हापूरातील डॉ. भालचंद्र काकडे यांचे काल चेन्नई येथे ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला. ऑक्सिजनचा उपयोग विविध क्षेत्रात कसा करता येईल याबाबत संशोधन करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कमावलेल्या आणि तब्बल सात पेटंट घेतलेल्या तरुण संशोधकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे.

Dr. Bhalchandra Kakade passed away in Chennai
डॉ. भालचंद्र काकडे यांचे कोरोनाने चेन्नईत निधन

By

Published : May 8, 2021, 9:22 AM IST

Updated : May 8, 2021, 1:45 PM IST

कोल्हापूर - ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या जगविख्यात संशोधकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे. डॉ. भालचंद्र काकडे यांचा चेन्नई येथे ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला. त्यांच्यावर कोरोना उपचार सुरू होते. ही बातमी कळताच संशोधन क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

ऑक्सिजन क्षेत्रात सात पेटंट

ऑक्सिजनचा उपयोग विविध क्षेत्रात कसा करता येईल याबाबत संशोधन करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कमावलेल्या आणि तब्बल सात पेटंट घेतलेल्या तरुण संशोधकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे. या घटनेने शिवाजी विद्यापीठसह कोल्हापूरवासीयांना धक्का बसला आहे. कोल्हापूरच्या डॉ. भालचंद्र काकडे यांचा मृत्यू मनाला चटका लावणारा आहे.

काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली. किरकोळ लक्षणे असल्याने चार दिवस त्यांनी घरातच उपचार घेतले. पण, एक दिवस प्रकृती बिघडल्याने त्यांना चेन्नई येथील एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस त्यांच्यावर तेथे उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती सुधारली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ते उपचाराला अतिशय चांगला प्रतिसाद ते देत होते. पण, मंगळवारी रात्री उशिरा अचानक त्या रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपला. यामुळे तेथे उपचार घेत असलेल्या दहा जणांचा तडफडून मृत्यू झाला. त्यामध्ये काकडे यांचाही समावेश होता.

आंतरराष्ट्रीय संशोधक म्हणून जगभर नाव

डॉ. भालचंद्र काकडे यांनी शिवाजी विद्यापीठात रसायनशास्त्र विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा वापर करून विविध क्षेत्रात काय करता येईल याचे संशोधन सुरू केले. या संशोधनात त्यांनी सात पेटंटही घेतले. जपान, अमेरिका येथील फेलोशिप ही त्यांना मिळाली. यामुळे आंतरराष्ट्रीय संशोधक म्हणून त्यांचे जगभर नाव झाले. ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या या संशोधकाचा केवळ ऑक्सिजन पुरवठा थांबल्यामुळे अंत झाला. यामुळे प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

Last Updated : May 8, 2021, 1:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details