कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि केदारलिंग जोतिबा चरणी मोठ्या प्रमाणात भाविक सोने चांदीचे दागिने दान करत असतात. 2019-20 च्या आर्थिक वर्षात सुद्धा भाविकांनी मोठ्या प्रमाणात अंबाबाई आणि जोतिबाच्या चरणी सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले आहेत. अंबाबाई चरणी 191 तोळे सोन्याचे दागिने तर जोतिबा चरणी 28 तोळे दागिने भक्तांनी दान केले आहेत तर चांदीचा विचार केल्यास अंबाबाई चरणी 18 किलो चांदीचे दागिने तर जोतिबा चरणी जवळपास 8 किलो चांदीचे दागिने भक्तांनी अर्पण केले आहेत.
अंबाबाई आणि जोतिबा चरणी यंदा तब्बल 'इतक्या' किंमतीचे दागिने दान - कोल्हापूर ज्योतिबा न्यूज
15:36 December 23
2019-20 च्या आर्थिक वर्षात अंबाबाई चरणी 191 तोळे सोन्याचे दागिने तर जोतिबा चरणी 28 तोळे दागिने भक्तांनी दान केले आहेत तर चांदीचा विचार केल्यास अंबाबाई चरणी 18 किलो चांदीचे दागिने तर जोतिबा चरणी जवळपास 8 किलो चांदीचे दागिने भक्तांनी अर्पण केले आहेत. याची किंमत जवळपास 83 लाख 76 हजार 99 इतकी झाली आहे.
कोरोनामुळे मूल्यांकनास उशीर
मूल्यांकन केल्यानंतर या सोने-चांदीच्या दागिन्यांची किंमत जवळपास 83 लाख 76 हजार 99 इतकी झाली असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे. दरवर्षी भक्तांनी दान केलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांचे मूल्यांकन केले जाते. यावर्षी कोरोनामुळे थोडा उशीर झाला आहे. शिवाय 2018-19 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2019-20 मध्ये मोठी घट झाल्याचे एकूणच आकडेवारीवरून दिसून आले आहे.
गतवर्षी आणि यावर्षी वजनानुसार सोने-चांदीचे 'इतके' दान -
दरवर्षी अंबाबाई चरणी सोने चांदीचे दागिने दान केले जाते त्याचे मूल्यांकनही केले जाते. यावर्षी कोरोनामुळे मूल्यांकन उशिरा झाले. या वर्षीच्या मूल्यांकनानंतर मिळालेल्या आकडेवारीनुसार, गतवर्षी 2018-19 च्या तुलनेत यावर्षी 2019-20 आर्थिक वर्षात मोठी घट झाली आहे. जवळपास 42 लाख 71 हजार रुपयांची घट यावर्षीच्या दागिन्यांमध्ये झाली आहे.
2018-19 या आर्थिक वर्षात 1 कोटी 26 लाख 47 हजार 505 रुपयांचे सोन्या चांदीच्या दागिन्यांचे अंबाबाई आणि जोतिबा चरणी दान झाले होते. तेच आता 2019-20 आर्थिक वर्षात 83 लाख 76 हजार 099 इतके दान झाले आहे. दागिन्यांच्या वजनानुसार विचार केल्यास गतवर्षी 2018-19 आर्थिक वर्षात अंबाबाई चरणी भाविकांनी 335 तोळ्यांहून अधिक सोने तर 16 किलो चांदीचे दान केले होते. तेच आता 2019-20 या आर्थिक वर्षात अंबाबाई चरणी 191 तोळे सोने तर 18 किलो चांदीचे भक्तांनी दान केले होते. त्याचबरोबर गतवर्षी 2018-19 आर्थिक वर्षात जोतिबा चरणी 17 तोळे सोने तर दीड किलो चांदीचे भाविकांनी दान केले होते. तर 2019-20 या आर्थिक वर्षात जोतिबा चरणी 27 तोळ्यांतून अधिक सोन्याचे दागिने तर जवळपास 8 किलो चांदीचे दागिने दान केले आहेत.